काँग्रेसच्या आमदाराला भाजप नगसेवकाकडून मारहाण

भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना भाजपमधून निलंबित

Updated: Apr 10, 2016, 07:19 PM IST
काँग्रेसच्या आमदाराला भाजप नगसेवकाकडून मारहाण title=

गोंदिया : काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलंय. आमदार गोपाल अग्रवाल यांची पत्रकार परिषद सुरु असताना त्यांच्यावर भाजप नगरसेवक शिव शर्मा यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अग्रवाल जखमी झाले आहेत. 

शिव शर्मा यांनी गोपाल अग्रवाल यांच्याकेलेला हल्ला जुन्या वैमन्यासातून झाला असल्याची माहिती समोर येतेय. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी शिवशर्मा यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसनं गोंदिया बंदची हाक दिली आहे.