सांगलीत पहिल्यांदाच फुललं कमळ!

सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त जागा मिळवून भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलाय. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजप बहुमत मिळवण्यात यशस्वी झालाय. 

Updated: Feb 24, 2017, 08:59 PM IST
सांगलीत पहिल्यांदाच फुललं कमळ! title=

सांगली : सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त जागा मिळवून भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलाय. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजप बहुमत मिळवण्यात यशस्वी झालाय. 

सर्वात जास्त जागा घेणारा भाजपच मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिलीय. 

'झी 24 तास'चा अंदाज ठरला खरा ठरल्याचंच या निकालातून दिसतंय. भाजपाला मिळालेल्या 25 जागा आणि 4 रयत विकास आघाडी असं 29 संख्याबळ झालं ठरलंय.  

सांगली जिल्हा परिषद निकाल : एकूण जागा 60

बीजेपी - 25

रयत विकास आघाडी - 4

राष्ट्रवादी अधिक स्वाभिमानी विकास आघाडी - 8

काँग्रेस - 8

शिवसेना - 3

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

अपक्ष - 1

भाजप आणि आघाडी = 29

तर

राष्ट्रवादी आणि आघाडी = 18

सांगली जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला बहुमताला केवळ 2 मतं आवश्यक आहेत.