सिंधुदुर्ग : काँग्रेस नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय. 'धोतराच्या धंद्यात कमावलं आणि मुलाच्या नादात लुगडं गमावलं' अशा शेलक्या शब्दांत जठार यांनी राणेंना टोला लगावलाय.
काळ कुठे जात आहे. याचे भान राणे यांनी ठेवले पाहिजे. ज्यांचे स्वागत आधी फुलांनी व्हायचं त्यांचे स्वागत आता दगडांनी होतंय, अशा शब्दात जठार यांनी राणेंना चिमटा काढलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी नितेश राणे यांच्या वाहनावर काही जणांना दगडफेक केली होती. याप्रकरणी नितेश राणेंनी ओरोस पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केलीये.
दगडफेकीत एक जण जखमीही झाला होता. नितेश राणे मालवणला जात असताना ओरोस रानबांबुळी गावा दरम्यान ही घटना घडली होती. राणेंच्या बालेकिल्लातच राणे पुत्रावर दगडफेक होतेय. त्यामुळे या घटनेवरुनही राणेंना टोला लगावण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.