भाजप आमदार लावणार संघाच्या शाखेत हजेरी

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समन्वय असावा, अशी सूचना आज संघाने भाजपच्या सर्व आमदारांना दिली आहे. त्यामुळे आमदार संघाच्या शाखेत हजेरी लावावी लागणार आहे.

Updated: Dec 15, 2016, 09:36 PM IST
भाजप आमदार लावणार संघाच्या शाखेत हजेरी title=

नागपूर : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समन्वय असावा, अशी सूचना आज संघाने भाजपच्या सर्व आमदारांना दिली आहे. त्यामुळे आमदार संघाच्या शाखेत हजेरी लावावी लागणार आहे.

महिन्यातून एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जा, अशी सूचना संघाने राज्यातील भाजपच्या आमदारांना केली आहे. नागपुरात आज रेशीमबागेतील संघ कार्यालयात भाजप आमदारांना पाचारण करण्यात आले होते. 

यावेळी आमदारांच्या बैठकीत क्षेत्रीय प्रचारक रवींद्र जोशी यांनी ही सूचना आमदारांना केली आहे. तसेच संघ शाखेत जाऊन पदाधिका-यांशी समन्वय वाढवा, असा सल्लाही आमदारांना देण्यात आला. 

दरम्यान, आज रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरात शाळा, संघाच्या शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतेक मंत्री आणि आमदारांनी हजेरी लावली.