व्हिडिओ: अमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण

जनतेच्या विकासाचा आणि भल्याचा दावा भाजप शिवसेना युतीचं राज्य सरकार करत आहे. मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांवरती लाथाबुक्क्यांचा प्रहार करत आहेत. जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अमळनेर बाजार समितीचे सभापती उदय वाघ आणि शिवसेनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष असलेले अनिल अंबर पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय. 

Updated: Oct 25, 2015, 02:33 PM IST
व्हिडिओ: अमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण title=

अमळनेर: जनतेच्या विकासाचा आणि भल्याचा दावा भाजप शिवसेना युतीचं राज्य सरकार करत आहे. मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांवरती लाथाबुक्क्यांचा प्रहार करत आहेत. जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अमळनेर बाजार समितीचे सभापती उदय वाघ आणि शिवसेनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष असलेले अनिल अंबर पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय. 

याबाबत जाब विचारायला गेलेल्या शेतकऱ्यांच्याच अंगावर हे दोघे धावून गेले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अमळनेर पोलिसांसमोरच घडला. 

मारहाण करणाऱ्या या दोघांविरोधात तक्रार द्यायला गेलेल्या शेतकरी संचालकांना मात्र अमळनेर पोलिसांनी पिटाळून लावलं. 

पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.