नवी मुंबई : भाजपमध्ये दोन गटांत राडा झाला. मारहाण प्रकरणानंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मंदा म्हात्रे आणि वर्षा भोसले या दोन गटात प्रथम शब्दीकनंतर चकमकीनंतर हाणामारी झाली.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपमधीलअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बोलवण्यात आली होती. बेलापूरमधील के स्टार हॉटलमध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपच्या प्रदेश चिटणीस वर्षा भोसले यांना केली शिवीगाळ केली. त्यानंतर हातापायी देखील झाली. यात वर्षा भोसले यांचे समर्थक उत्तम रावले यांना मारहाण झाली. मंदा म्हात्रे यांच्या मुलाने देखील मारहाण केली होती.
या बैठकीला आमदार संजय केळकर, प्रमुख संघटक सुनील कर्जतकर आणि मारुती भोईर उपस्थित होते. यांच्यासमोर झाला हंगामा झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात वर्षा भोसले यांनी शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.