ठाण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक

राज्यात महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ठाण्यामधील राज्य कार्यकारिणीची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीआधी युतीला विरोध करणारी पोस्टर लावण्यात आली आहेत. त्यामुळे बैठकीत येणा-या निवडणुकांमध्ये होणा-या युतीबाबत पदाधिका-यांचा काय सूर उमटतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated: Jan 12, 2017, 10:31 AM IST
ठाण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक title=

ठाणे : राज्यात महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ठाण्यामधील राज्य कार्यकारिणीची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीआधी युतीला विरोध करणारी पोस्टर लावण्यात आली आहेत. त्यामुळे बैठकीत येणा-या निवडणुकांमध्ये होणा-या युतीबाबत पदाधिका-यांचा काय सूर उमटतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळी 11 वाजता कार्यकारिणीच्या सुरवातीला प्रदेशाद्याक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षीय भाषण करतील. तर कार्यकारणीचा समारोप 4 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे. बैठकीत दिवसभरात 2 प्रस्ताव मांडण्यात येतील. नोटबंदीबाबत अभिनंदन प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणतील , तर राज्यात नगरपरिषदा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन प्रस्ताव विनोद तावडे मांडणार आहेत.