मुंबईच्या रोजच्या धकाधकीत निदान एक दिवस तरी निसर्गाच्या सानिध्यात शांतीचा मिळावा, म्हणून एक ठिकाण ठाण्याच्या जवळ नावारूपाला आलं आहे. कुटूंबाला घेऊन जाण्यासाठी, लहान मुलांनाही आनंद देणारं हे ठिकाण आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडला असलेलं 'ब्लू रूफ क्लब'ची रचना हा तुम्हाला स्पेशल हॉलिडेचा आनंद देणारं ठिकाण आहे.
सात एकर जागेवर हे क्लब उभारण्यात आलं आहे. या क्लबमध्ये तुम्हाला मेंबरशीपही दिली जाते. या क्लबमध्ये स्वीमिंग, रायफल शुटिंगचीही सोय आहे. इनडोअर गेम्स, बॅडमिंटन, स्क्वॅश, लॉन टेनिस, रॉक क्लाईबिंगही तुम्हाला करता येणार आहे.
पोहण्यासारखा व्यायाम नाही असंही म्हणतात, पोहण्याशिवाय स्टीमबाथ, सोनाबाथ आहे. ब्लू रूफ सभासदांशिवाय इतर लोकांसाठीही खुलं असतं.
इथली जेवणाची लज्जतही न्यारीच आहे बरं का? शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे मेनू इथे मिळतात. मांसाहारात साबरी कबाब, मोती कबाब प्रसिद्ध आहेत. या शिवाय सहलीचे प्रयोजनही आहे, यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, याचा आनंद प्रौढ आणि लहान मुलंही घेऊ शकतात.
श्रीयुत मोलॉय बक्षी हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत, त्यांनी या ठिकाणाची निर्मिती केली आहे. तर श्रीमती तनुजा बक्षी या संपूर्ण जागेचं नियोजन करतात. या ठिकाणी कमी मोबदल्यात लोकांना जास्तज जास्त आनंदी कसं ठेवता येईल, यावर त्यांचा भर आहे.
येथे शिबीर, योगा, डान्सिंग आणि स्विमिंग क्लासचीही सोय आहे. ब्लू रूफ सध्या लग्नसराईसाठी चर्चेत आहे. कारण इथली हिरवळ आणि लग्नाचे हॉल वऱ्हाडी मंडळींमध्ये लोकप्रिय होत आहेत.
लग्नाला आल्याचा थकवा इथे कधीच जाणवत नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. प्रशस्त जागेमुळे एकाच वेळी पंधराशे जण लग्न समारंभात भाग घेऊ शकतात. अशा निसर्ग रम्य ठिकाणाला एकदा तरी भेट द्यावी, असं हे ठिकाण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.