पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या बोपखेलमधील विध्यार्थ्यानी रस्त्यासाठी आता थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे साकडं घालत, कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केलीये.
बोपखेल-दापोडी या लष्करी मार्गासाठी २१ मे २०१५ला हिंसक आंदोलन झालं. मात्र तरीही लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता कायमचा बंद करत, मुळा नदीवर तरंगता पूल उभारला.
परंतु पावसाळ्यात या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण देत ७ जुनला लष्कराने हा पूल नदीवरून हटवला. त्यामुळं गावकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची १० ते १५ किलोमीटरची पायपीट पुन्हा सुरु झाली. असं असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, स्थानिक लष्कर प्रमुख, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांनी बैठक घेऊन तरंगत्या पुलाठीकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्यावर तोडगा काढला.
कामाला सुरुवात न झाल्यानं गेल्या महिन्यात ही आमरण उपोषण करण्यात आलं होतं. तर आता विध्यार्थ्यानी थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे साकडं घालत रस्त्याची मागणी केली आहे.