मैदानात खेळतांना चेंडू ऐवजी हातात आली मानवी कवटी

मैदानावर क्रिकेटची मॅच खेळत असतांना बॉल शोधण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या हाताता चक्क बॉल ऐवजी मानवी कवटी आणि इतर ७ ते ८ हाडे जळलेल्या अवस्थेत मिळाल्यानं खळबळ उडाली. 

Updated: Feb 26, 2016, 11:10 PM IST
मैदानात खेळतांना चेंडू ऐवजी हातात आली मानवी कवटी title=

कोल्हापूर : मैदानावर क्रिकेटची मॅच खेळत असतांना बॉल शोधण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या हाताता चक्क बॉल ऐवजी मानवी कवटी आणि इतर ७ ते ८ हाडे जळलेल्या अवस्थेत मिळाल्यानं खळबळ उडाली. 

ताराबाई पार्क येथील वारणा कॉलनीच्या कपाऊंडमध्ये मुले खेळत असतांना ही गोष्ट उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयास्पद कवटी आणि हाडे ताब्यात घेतली आहेत. जप्त करण्यात आलेल्या कवटीचा एक डोळा आणि जबडा जळलेल्या अवस्थेत आहे.

शाहुपुरी पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. हत्या करून ती जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.