जन्मदात्या आईला मुलाने बांधून ठेवले साखळदंडात

वृद्ध आईला साखळदंडानं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात उघड झालाय. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराचा छडा लागला.  

Updated: Feb 23, 2016, 01:16 PM IST
जन्मदात्या आईला मुलाने बांधून ठेवले साखळदंडात title=

बुलडाणा : वृद्ध आईला साखळदंडानं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात उघड झालाय. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराचा छडा लागला.  

बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमधला हा व्हिडीओ असल्याचं कळलं आणि पोलीस तपास करत हरीदास गणबासच्या घरी पोहोचले. 

हरीदासनं त्याच्या ९० वर्षांच्या आईला साखळदंडानं बांधून ठेवलंय. आई मनोरुग्ण आहे, कधीतरी ती न सांगता निघून जाते, त्यामुळेच हा प्रकार केल्याचा हरिदासचा दावा आहे. 

हरिदास असं सांगत असला, तरी या महिलेला २४ तास बांधून ठेवत असल्याचं शेजारी सांगतात. पोलिसांनी हरिदास विरोधात गुन्हा दाखल केलाय.  

हरिदासच्या घरी पोलीस पोहोचल्यावर या महिलेची साखळदंडातून सुटका करण्यात आली आणि तिला मलकापूरच्या जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आलंय.