लातूर बसस्थानकात उभी बस महिलेनं पेटवली

लातूर शहर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसला काल रात्री 29 वर्षीय महिलेनं पेटवून दिलं. यामध्ये बसच्या मागील बाजूच्या 6 सीट्स जळाल्या. अग्निशमन दलानं वेळीच धाव घेतल्यानं अनर्थ टळला. 

Updated: May 21, 2015, 04:30 PM IST
लातूर बसस्थानकात उभी बस महिलेनं पेटवली title=

लातूर: लातूर शहर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसला काल रात्री 29 वर्षीय महिलेनं पेटवून दिलं. यामध्ये बसच्या मागील बाजूच्या 6 सीट्स जळाल्या. अग्निशमन दलानं वेळीच धाव घेतल्यानं अनर्थ टळला. 

औसा तालुक्यातील बेलकुंड इथली ही महिला आहे... तिच्या छोट्या बहिणीवर दीड वर्षापूर्वी बलात्कार झाला होता. मात्र त्या प्रकरणी पोलिसांनी योग्य न्याय मिळवून न दिल्याचा महिलेचा आरोप आहे. महिला लातूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटण्यासाठी आली होती. मात्र तिची भेट झाली नाही. त्यामुळे नैराश्यातून या महिलेनं ही बस पेटविल्याचं बोललं जात आहे. 

या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.