तीन जणांचा फडशा, नरभक्षक वाघाची दहशत

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत पसरलीय. यामुळे, ग्रामस्थांनी भीतीपोटी कामावर जाणंही बंद केलंय. 

Updated: Sep 13, 2016, 03:09 PM IST
तीन जणांचा फडशा, नरभक्षक वाघाची दहशत  title=

यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत पसरलीय. यामुळे, ग्रामस्थांनी भीतीपोटी कामावर जाणंही बंद केलंय. 

राळेगावच्या वनक्षेत्रानजिकच्या भागात नरभक्षक वाघाने आतापर्यंत तीन जणांना ठार केले असून गायी-गोऱ्ह्यांचादेखील फडशा पाडलाय. त्यामुळे शेतकरी-शेतमजुरांनी शेतात जाणे बंद केले असून कमालीची दहशत या परिसरात आहे.

वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी पिंजरा ठेऊन भयभीत ग्रामस्थांमध्ये जनजागृती सुरु केली आहे. हा वाघ नरभक्षक झाला असून तो आणखी कुणावरही हल्ला करू शकतो. या वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केलीय.