कल्याणमधून १५ लाखांसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या

कल्याणमध्ये नयन जैन या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेय.

Updated: Mar 4, 2016, 08:49 AM IST
कल्याणमधून १५ लाखांसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या title=

कल्याण : कल्याणमध्ये नयन जैन या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेय.

नयन याचे काल कल्याणच्या गांधी चौकातून अपहरण झालं होते. अपहरण करुन १५ लाखांची खंडणी मागण्यात आली होती. अपरहरणकर्त्यांनी रेल्वेमधून १५ लाख रूपये टिटवाळा स्स्टेशनजवळ फेकायला सांगितले. त्या प्रमाणे नातेवाईकांनी आज सकाळी टिटवाळा जवळ एका बॅगेतून पैसे टाकले. 

ते उचलत असताना एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर त्याची चौकशी करून आणखी दोघांना ताब्यात घेतलं. नयनच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम्स शोधासाठी काल रात्रीपासून मुरबाड शहापूर भागात फिरत होत्या. मात्र, आज सकाळी अपहरणकर्त्यांनी नयनची हत्या केली आणि त्याचा मृतदेह मुरबाडजवळच्या नदीत फेकून दिला.