नंदुरबाद : नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे या मुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो.
या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणासाठी घातक असलेल्या मांजाची विक्री होत असते. त्यातून अनेक अपघात घडतात. तसंच अनेक पक्षी आणि माणसंही जायबंदी होतात. म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक विशेष मोहीम उघडण्यात आली.
त्याअंतर्गत बंदी असलेल्या मांजाची विक्री होत असलेला ठिकाणी धाडी टाकून हा मांजा जप्त करण्यात आला. चायनीज नायलॉन मांजावर पर्यावरण विभागानं बंदी आणली आहे. अशा मांजाची विक्री होत आसल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी ही कारवाई केली.