वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून धावत्या कारमध्ये बलात्कार

वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून तिचेवर चालत्या वाहनात बलात्कार केल्याची खळबळजनक घटना यवतमाळ च्या पांढरकवडा बायपास मार्गावर उघडकीस आली. मद्यधुंद नराधमांकडून मुलीवर वाहनात सुरु असलेला अत्याचार नागरिकांच्या लक्षात आल्याने पीडित मुलीची सुटका झाली.

Updated: Mar 11, 2016, 02:31 PM IST
वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून धावत्या कारमध्ये बलात्कार title=

यवतमाळ : वर्गमैत्रिणीला शीतपेयात दारू पाजून तिचेवर चालत्या वाहनात बलात्कार केल्याची खळबळजनक घटना यवतमाळ च्या पांढरकवडा बायपास मार्गावर उघडकीस आली. मद्यधुंद नराधमांकडून मुलीवर वाहनात सुरु असलेला अत्याचार नागरिकांच्या लक्षात आल्याने पीडित मुलीची सुटका झाली.

यवतमाळच्या राळेगांव तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या श्रीकांत तथा गुड्डू बेंबारे आणि कय्युम शेख या दोन नराधमांनी आपल्या वर्गमैत्रिणीला शॉपिंग करण्याच्या बहाण्याने इंडीका कारमधून यवतमाळला आणले. दरम्यान तिला शीतपेयातून दारू पाजण्यात आली. त्यामुळे शुद्ध हरविलेल्या मैत्रिणीवर गुड्डू व कय्युम यांनी अत्याचार केले.

 

यवतमाळ शहरालगतच्या पांढरकवडा मार्गावरील निर्मनुष्य ठिकाणी चालत्या वाहनात श्रीकांत बेंबारे व कय्युम शेख यांनी आळीपाळीने बेशुद्धावस्थेतील वर्गमैत्रीवर बलात्कार केला. या नराधमांनी काही वेळाने पुन्हा एका निर्जन स्थळी वाहन थांबवून तिच्यावर अत्याचार सुरु केलेत. मात्र हा गंभीर प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास पडला.

नागरिकांनी लगेचच मुलीकडे धाव घेऊन  नराधमांच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका केली. आणि दोघांनाही चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी  दोघांनाही अटक करून त्याच्यावर बलात्कार आणि अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाआहे.
          
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मैत्रीला कलंकित करणारे दुष्कृत्य उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.