पुणे : स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुणे महापालिकेत भाजप इच्छुकांनी जबरदस्त राडा केला आहे. त्यामुळे पुण्यात भाजपच्या पारदर्शी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
भाजप इच्छुकांनी भाजपचे कार्यालय आणि सभागृह नेत्याचे कार्यालय फोडले. तसेच गणेश बीडकर यांना मारहाण करून तुफान तोडफोड केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
भाजपचे गणेश घोष आणि गणेश बीडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारमारी झाल्याची माहिती समोर आली आहे.