पिंपरीत भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

शहरात सकाळी एक दुर्देवी घटना घडली आहे. शाहूनगर परिसरात एका स्विफ्ट चालकाने दुचाकीला उडवलंय

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 26, 2016, 09:10 AM IST
पिंपरीत भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू title=

पिंपरी चिंचवड :शहरात सकाळी एक दुर्देवी घटना घडली आहे. शाहूनगर परिसरात एका स्विफ्ट चालकाने दुचाकीला उडवलंय. आज सकाळी झालेल्या या अपघातात दुचाकीवरचे पती पत्नी दोघेही जागीच ठार झालेत.

अनिल बनगर, नीलम बनगर अशी या दोघांची नावं आहेत. स्विफ्ट गाडीच्या ड्रायव्हरची अजून ओळख पटू शकलेली नाही. कारण गाडीचं स्टेअरिंग लागून या ड्रायव्हरला मोठी दुखापत झाली आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.