गोहत्या बंदीसाठी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले

गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी वारकरी जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं. वारक-यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला.

Updated: Jul 9, 2014, 09:37 AM IST
गोहत्या बंदीसाठी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले title=

पंढरपूर :गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी वारकरी जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं. वारक-यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला.

वारक-यांनी मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवल्याने पुजा करण्यासाठी पाऊणतास उशीर झाला. 15 दिवसांच्या आत निर्णय देण्याचं आश्वासन दिल्यानं वारक-यांनी आंदोलन मागे घेत मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी परवानगी दिली. या आंदोलनामुळं वारक-यांना विठूरायाच्या दर्शनासाठी बराच वेळ रांगेत थांबावं लागलं.

दरम्यान, देहूतून तुकोबा आणि आळंदीहून निघालेल्या ज्ञानोबांची पालखी आणि त्याचबरोबर राज्याच्या कानाकोप-यातून निघालेल्या वेगवेगळ्या पालख्या, दिंड्या सर्व विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरात दाखल झाल्यात.

सावळ्या विठूरायाच्या दर्शनाची आता वारक-यांना ओढ लागलीय.. मंदिर परिसरात मोठ्याच मोठ्या रांगा पाहायला मिळताय आहेत. राज्यातूनच नाहीतर देशाच्या विविध प्रांतातून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.