केडीएमसीमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत पहिल्यांदाच सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. एकूण ७४१ उमेदवारांपैकी १२१ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक लढवतायेत. 

Updated: Oct 28, 2015, 03:01 PM IST
केडीएमसीमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार title=

अजित मांढरे, झी मीडीया, डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत पहिल्यांदाच सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. एकूण ७४१ उमेदवारांपैकी १२१ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक लढवतायेत. 

धक्कादायक प्रकार म्हणजे भाजप पक्षानेच सर्वात जास्त गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे निवडणूकीला उभे केलेत. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देण्यात दुस-या क्रमांकावर शिवेसेना अणि तिस-या क्रमांकावर मनसे आहे. तर सर्वात धनाड्य १०७ कोटी रुपये ज्यांची संपत्ती आहे अशा सुधीर गायकर यांना मनसेने उमेदवारी दिलीये. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत किती गुन्हेगारी स्वरुपाचे गुंड निवडणुन जाणार हा चर्चेचा विषय ठरलाय.

वास्तव काय आहे 
- १२१ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार रिंगणात
- सर्वात जास्त भाजपने दिले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
- तर मनसेच्या उमेदवाराची संपत्ती १०७ कोटींची

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूीत ७५० पेक्षा जास्त उमेदवार केडीएमसी निवडणुक लढत आहेत. अशातच विविध रंगाचे आणि ढंगाचे उमेदवार मतदारांना पहायला मिळतात. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुक याना ना त्या कारणाने गाजत असताना आता सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार केडीएमसी निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक चांगलीच गाजत आहे. 

महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीमध्ये भाग घेणा-या ७५३ उमेदवारांपैकी ७४१ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले. 

यात १२१ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत. यात ९५ उमेदवारांवर खून, खूनाचे प्रयत्न, अपहरण आणि दरोडा सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात सर्वात जास्त २८ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार भाजपने दिलेत. तर  २६ शिवसेना आणि २१ गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार मनसेने दिलेत.  या मुद्दावरुनही भाजप सेनेने एकमेकांवर टीका करण्याचा चान्स सोडला नाहीये.

केडीएमसी निवडणुक या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी उमेदवारांमुळे गाजत असताना कोट्याधीश उमेदवारांमुळे ही केडीएमसी निवडणुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण केडीएमसी मधील उमेदवारांची संपत्ती किमान १ कोटी रुपये ते १०० कोटी रुपये आहे. वॉर्ड २० मधील मनसेचे सुधिर गायकर यांची संपत्ती त्यांना १०७ कोटी रुपये घोषीत केलीये. तर वॉर्ड नंबर ३ मधील शालिनी वायले यांनी त्यांची संपत्ती १०३ कोटी जाहीर केलीये. २० पेक्षा जास्त उमेदवारांनी संपत्ती १० कोटी रुपये जाहीर केलीये. आणि निवडणुक रिंगणात उतरलेलेल्या सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती १ कोटी ७५ लाख रुपये आहे. 

राजकारण हे गुन्हेगारी आणि धनाढ्यांच यांच्या अवती भोवतीच फिरत असते. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कल्याण डोबविली महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आलाय. तेव्हा आता कल्याण डोंबिवलीकरांनो मतदान करताना उमेदवारांची पार्श्वभूमी लक्षात घ्या आणि योग्य उमेदवारालाच मतदान करा हेच आवाहन.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.