भाजपच्या सारंग कामतेकरांच्या उमेदवारीने भाजपमध्येच असंतोष

राष्ट्रवादी काँग्रेस कडून सत्ता हस्तगत करायला उत्सुक असलेली भाजप अंतर्गत कलहाने पुरती हैराण झालीय...! आता अंतर्गत कलहाच निमित्त आहे लक्ष्मण जगताप यांचे मास्टर माईन्ड आणि लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांची उमेदवारी

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 30, 2017, 10:47 PM IST
भाजपच्या सारंग कामतेकरांच्या उमेदवारीने भाजपमध्येच असंतोष

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस कडून सत्ता हस्तगत करायला उत्सुक असलेली भाजप अंतर्गत कलहाने पुरती हैराण झालीय...! आता अंतर्गत कलहाच निमित्त आहे लक्ष्मण जगताप यांचे मास्टर माईन्ड आणि लॅपटॉप मॅन सारंग कामतेकर यांची उमेदवारी

पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच शहराध्यक्ष पद लक्ष्मण जगताप यांच्याकडे गेल्यापासूनच त्याच्या बरोबर सारंग कामतेकर ही पक्षाला आंदण मिळाले...! त्यांचा पक्षातला नको तेवढा हस्तक्षेप आणि जगताप यांचा त्यांच्यावर नको तेवढा असलेला विश्वास या मूळ सुरुवाती पासूनच भाजप मधला मोठा वर्ग त्यांच्यावर नाराज होता... आता त्यात भर पडलीय ती आमदार महेश लांडगे यांच्या नाराजीची... महेश लांडगे यांना भोसरी मध्ये कोणाचाही हस्तक्षेप नको आहे. तर सारंग कामतेकर यांनी भोसरी मध्ये च उमेदवारी मागितली आहे... कामतेकर यांचा विजय झाला तर ते पुढं डोकेदुखी ठरणार हे स्पष्ट असल्याने महेश लांडगे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरु केलाय.. पक्षात ले जुने लोक ही सारंग कामतेकर यांच्या संभाव्य उमेदवारीने नाराज आहेत...

 

पिंपरी चिंचवड मध्ये भाजप ची ताकत वाढली आहे खरी... पण त्याला सुरुवातीपासूनच अंतर्गत कलहाचा शाप लागलाय...! जगताप गट, साबळे गट, नवा भाजप गट, जुना भाजप गट आणि आता महेश लांडगे गट...! या गटातटामुळं भाजप सध्या पुरती धुमसत आहे... आणि त्यात कामतेकर यांची उमेदवारी तेल ओतण्याचे काम करत आहे...!