पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या बोपखेल परिसरात दुसऱ्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आलीय.
लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून जाणारा रस्ता खुला करावा यासाठी बोपखेलवासियांनी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी मोठा लाठीचार्ज करत आंदोलन चिरडून टाकलं होतं.
या प्रकरणी पोलिसांनी १७४ जणांना अटक करण्यात आलीय. यात ७६ महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व नागरिकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून १५६ जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. १८ जणांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. या व्यतिरिक्त १२ अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय...
दरम्यान, गुरुवारी झालेल्या हिंसाचारात ५० नागरिक आणि २३ पोलीस जखमी झाले होते. बोपखेलमध्ये सध्या परिस्थिति नियंत्रणात आणि शांत आहे. पण, अटक झालेल्या नागरिकांना सोडून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.