वाघासोबत सेल्फी काढणे पडले महागात, घातली झडप

काही दिवसांपूर्वी जपानमध्ये एक महिला सिंहाचं भक्ष्य झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता...असाच काहीसा प्रकार नागपूरमध्ये घडला... 

Updated: Aug 18, 2016, 08:46 PM IST
वाघासोबत सेल्फी काढणे पडले महागात, घातली झडप  title=

नागपूर : काही दिवसांपूर्वी जपानमध्ये एक महिला सिंहाचं भक्ष्य झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता...असाच काहीसा प्रकार नागपूरमध्ये घडला... 

नागपूरमध्ये एका वाघाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका युवकाच्या जीवावर बेतणार होता... कुही गावातल्या सातारा गावामध्ये ही घटना घडलीये. रामकृष्ण डहाके असं वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. डहाके यांना शेतमधल्या झुडपात एक वाघ झोपलेला आढळला... 

त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह डहाके आणि त्यांच्या मित्रांना आवरला नाही... मात्र फोटो काढत असतानाच वाघानं डहाकेंवर हल्ला चढवला. त्यांचा पाय वाघाच्या जबड्यात होता. मात्र सोबत असलेल्यांनी प्रसंगावधान दाखवून वाघाला पळवल्यानं डहाकेंचा जीव वाचला. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.