परभणीत हुंडा न मिळाल्याने मुलाने तोडली सोयरीक

हुंड्याच्या मागणीला कंटाळून आत्महत्येच्या काळीज पिळवून टाकणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडतायत. परभणीतही हुंडा न दिल्यानं मुलाकडच्यांनी सोयरीक तोडली.

Updated: Jan 23, 2016, 03:51 PM IST
परभणीत  हुंडा न मिळाल्याने मुलाने तोडली सोयरीक title=

परभणीत : हुंड्याच्या मागणीला कंटाळून आत्महत्येच्या काळीज पिळवून टाकणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडतायत. परभणीतही हुंडा न दिल्यानं मुलाकडच्यांनी सोयरीक तोडली.

मात्र, यातून सावरत या मुलीनं आणि तिच्या कुटुंबियांनी हुंडा घेणाऱ्या मुलाबरोबरच लग्न न करण्याचा ठाम निर्धार केलाय. परभणीतील एका कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळलाय. नारायणराव यांच्या मुलीचा विवाह वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील भारत भीमराव पवार याच्याशी ठरला होता.

 

कुंकू लावण्याची तारीख ही काढली होती.. मात्र, कुंकवापूर्वी नव-या मुलाच्या नातेवाइकांकडून दोन लाख रुपये, सोनं आणि मोटरसायकलची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे जन्मताच दारिद्र्यात असणाऱ्या कुटुंबीयांवर आभाळच कोसळलं.
 
गरिबी ज्यांच्या पाचवीलाच पुजलेली ते लोक एकाएकी येवढी रक्कम कुठून देणार. मुलानं येवढ्या मोठ्या हुंड्याची मागणी केल्यानं मुलीचे कुटुंबीय हादरलं होतं. त्यांनी पोलीस स्टेशनही गाठलं. त्याचबरोबर  सरकारी यंत्रणांचे उंबरठेही ते झिजवतायत. असं असूनही त्यांना काही केल्या न्याय मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी हुंडा घेणाऱ्या मुलाबरोबरच लग्न न करण्याचा निर्धार केलाय.

 
लातूरमध्ये लग्नात हुंडा द्यायला पैसे नसल्यानं मुलीनं आत्महत्या केली. तर नांदेडात बहिणीच्या लग्नात हुंडा द्यायला पैसे नसल्याने भावाने आत्महत्या केली होती. मात्र, हुंडा बंदीवरील आत्महत्या हा उपाय नसून समाजातील मुला-मुलींनी हुंडा देणार नाही घेणार नाही अशी भूमिका आता त्यांनी घेतल्याने कौतुक होत आहे.