नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विधानाची महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी खिल्ली उडवली आहे.
कदमांचं वक्तव्य गांभिर्यानं घ्यायची गरज नाही. त्याच्याकडे मनोरंजन म्हणून बघावं, असं खडसे म्हणालेत. तर उद्धव ठाकरे यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतलाय. बाहेरून पाठिंबा देऊनही सरकार स्थिर करता आलं असतं, असं खडसे म्हणाले.
सरकारकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे, मराठी माणसावर अन्याय झाला तर शिवसेना खासदार, आमदार संघर्ष करतील, असा इशारा खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेची पूर्ण सत्ता नाही, आम्ही फक्त सरकार स्थिर केलंय, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. तर दुसरीकडे रामदास कदम यांनीही थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा, मुंबईत मराठी माणसाला घरं उपलब्ध करुन द्या, असं वक्तव्य रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.