मुंबई : झी २४ तासच्या धागा शौर्य का.. राखी अभिमान की या अभिनव उपक्रमाला राज्यभरातल्या अनेक शाळांमधून उदंड प्रतिसाद मिळतोय. नाशिकच्या मीनाताई ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झी २४ तासच्या या विशेष उपक्रमामध्ये सहभाग घेतला. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणा-या जवानांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पत्र लिहीली..या विद्यार्थ्यांनी केवळ पत्रातूनच नव्हे तर प्रतिज्ञा सादर करुन जवानाबाबतची कृतज्ञता व्यक्त केली.
........
पिंपरी : पी के इंटरनॅशनल इंग्रजी स्कूल
पिंपरीतल्या पी के इंटरनॅशनल इंग्रजी माध्यम शाळेतही धागा शौर्य का राखी अभिमान की.. हा झी चोवीस तासचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रतीच्या आपल्या भावना पोस्ट कार्डवर उतरवल्या.
..........
व्ही एन सुळे विद्यालय
धागा शौर्यं का..राखी अभिमान कि या अभियानात भांडूप च्या व्ही एन सुळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जवानांप्रतीचं आपलं मनोगत व्यक्त केलं. दरम्यान जवानांप्रतीच्या भावना व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समूह गीत गायन केलं.
नागपूरच्या दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा
झी २४ तासच्या ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’ च्या या विशेष अभियानात नागपूरच्या दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. नागपूरच्या महाल भागात असलेल्या मुलीच्या या शाळेतील विद्यार्थिनींनी सीमेवर तैनात सैनिकांना पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्यात. विद्यार्थिनींनी शाळेचे पारंपारिक गीत देखील या प्रसंगी गायले. सीमेवर देशाचे आणि आपले
रक्षण करणारा सैनिक हा आपला खरा भाऊ असून त्याला पत्र लिहण्यात आपल्याला विशेष आनंद होत असल्याचे येथील विद्यार्थिनींनी म्हटले. शाळेच्या शिक्षिकेंनी देखील झी २४ तासच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.