आज रात्री होणार माऊलींच्या पालखीचं प्रस्थान

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे. 

Updated: Jul 9, 2015, 12:34 PM IST
आज रात्री होणार माऊलींच्या पालखीचं प्रस्थान  title=

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे. 

यावर्षी या प्रस्थान सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आलाय. साधारणपणे दुपारी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते मात्र यंदा रात्री नऊ वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

माऊलींच्या मंदिरात दर गुरुवारी माऊलींची महापूजा केली जाते आणि माऊलींना मंदिर प्रदक्षिणा घातली जाते त्यामुळे नित्य नियमाप्रमाणे गुरुवारची पूजा दुपारी करण्यात येणार आहे... आणि ही पूजा झाल्यानंतरच प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

माऊलींच्या पालखीचा मुक्काम दरवर्षी त्यांच्या आजोळ घरी होतो मात्र यंदा आजोळ घराच्या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरु आहे त्यामुळे माऊलींच्या मुक्कामाचं निवासस्थान बदलण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, आजोळघरीच माऊलींचा मुक्काम यंदाही असेल त्यात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचं आळंदी देवस्थानच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलंय. 

मात्र, इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं भाविकांची यावेळी थोडी अडचण होण्याची शक्यता आहे. पालखीचा मुक्काम आळंदीतील आजोळघरीच असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.