डॉ. सदानंद मोरे यांची घुमान साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

पंजाबच्या घुमान इथं एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे सर्वाधिक म्हणजे ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत.

Updated: Dec 10, 2014, 01:30 PM IST
डॉ. सदानंद मोरे यांची घुमान साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड title=

पुणे: पंजाबच्या घुमान इथं एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे सर्वाधिक म्हणजे ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती.  या निवडणुकीत डॉ. मोरे, ससाणे यांच्यासह डॉ. अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे रिंगणात होते. मोरे यांना ४९८, ससाणे यांना ४२७, कामत यांना ६५ तर नागपुरे यांना २ मतं मिळाली. 

संत नामदेव यांच्या घुमान या कर्मभूमीत ३ ते ५ एप्रिलदरम्यान साहित्य संमेलन रंगणार आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.