राज्यात दुष्काळ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उधळतायेत पैशाच्या नोटा

दुष्काळ दौरा करून राज्य सरकारवर आगपाखड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नियुक्त्यानंतर आतषबाजी, गुलाल आणि नोटांची उधळण करून जल्लोष साजरा केला.

Updated: Sep 1, 2015, 08:33 PM IST
राज्यात दुष्काळ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उधळतायेत पैशाच्या नोटा title=

नाशिक : दुष्काळ दौरा करून राज्य सरकारवर आगपाखड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नियुक्त्यानंतर आतषबाजी, गुलाल आणि नोटांची उधळण करून जल्लोष साजरा केला.

दरम्यान, या नियुक्त्यांच्या आधी पाच मिनिटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे सरकारवर तुटून पडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे दुसरे रुप पाहायला मिळाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सरकर दुष्काळाच्या प्रश्नावर गंभीर नसल्याची टीका करणाऱ्या नेत्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नोटांची आणि गुलालाची उधळण केल्याने विरोधकही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ सरकारवर टीका करण्याइतपतच गंभीर असल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. यांना दुष्काळाचे काहीही  वाटत नाही, असे भाजपने म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.