औरंगाबादेत मौजमजा करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी व्यापाऱ्याला लुटले

मौजमजा आणि पार्टी करण्यासाठी १५ उच्चशिक्षित तरुणांनी चक्क एका व्यापाऱ्याला लुटल्याचं समोर आले आहे. अडीच लाख रुपयांची रोकड लूटून पसार होण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार जण पोलिसांच्या हाती लागले. 

Updated: Dec 17, 2015, 10:54 AM IST
औरंगाबादेत मौजमजा करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी व्यापाऱ्याला लुटले title=

औरंगाबाद : मौजमजा आणि पार्टी करण्यासाठी १५ उच्चशिक्षित तरुणांनी चक्क एका व्यापाऱ्याला लुटल्याचं समोर आले आहे. अडीच लाख रुपयांची रोकड लूटून पसार होण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार जण पोलिसांच्या हाती लागले. 

काळ्या बुरख्याने चेहरा झाकलेल्या चौघांना
औरंगाबाद पोलिसांनी दरोड्या प्रकरणी जेरबंद केले आहे. केवऴ मौजमजा आणि पार्टी करण्यासाठी या चौघांनी परमानंद नावाच्या एका बीडी व्यापा-याला लुटलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ डिसेंबरला परमानंद बीडी विक्रीचे पैसे घेऊन परतत असतांना या आरोपींनी त्यांना औरंगाबाद - फुलंब्री मार्गावर आडवून त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली. या दरोड्याच्या कटात या चौघांसह एकूण ११आरोपी सहभागी होते. 

आरोपी रोकड घेवून पसार होताच परमानंद यांनी  घटनेची माहिती पोलिसांना दिली. आणि पोलिसांनी पाठलाग करुन दोघा आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी जेरबंद केलेल्या चौघापैकी शाम परदेशी नावाच्या आरोपीने व्यापारी पमानंद हे १५ लाखांची रोकड  घेवून जात असल्याची माहिती इतर आऱोपींना दिली होती.

आरोपींनी पार्टी करण्यासाठी पैशांची गरज होती आणि त्यासाठीच आरोपींनी लुटीचा कट रचला. त्यासाठी मोटर सायकल आणि कारचा वापर केला. मोठ्या चलाखीने आरोपींनी दरोड्याचा कट आखला आणि तो तडीस नेला. मात्र पोलिसांच्या तत्पर्तेमुळे आऱोपींचा डाव फसला. या दरोड्यातील सर्व आरोपी सुशिक्षित आणि सधन कुटुंबातील आहेत.

औरंगाबादमध्ये यापूर्वीही अशा पद्दतीने लुटीची घटना घडली होती. त्या गुन्ह्यातही या आऱोपींचा हात तर नाही ना याचा शोध औरंगाबाद पोलीस घेत आहेत.