खडसे नव्या वादात, दुष्काळग्रस्त लातूरमध्ये हेलिपॅडसाठी हजारो लिटर पाणी

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा लातूरचा दुष्काळी दौरा वादात सापडला आहे. एकनाथ खडसेंनी हेलिकॉप्टर साहाय्यानं लातूर जिल्ह्याचा दौरा केला. मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडला हजारो लीटर पाणी वापरल्याचा आरोप करण्यात आलाय.

Updated: Apr 15, 2016, 07:11 PM IST
खडसे नव्या वादात, दुष्काळग्रस्त लातूरमध्ये हेलिपॅडसाठी हजारो लिटर पाणी  title=

लातूर : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा लातूरचा दुष्काळी दौरा वादात सापडला आहे. एकनाथ खडसेंनी हेलिकॉप्टर साहाय्यानं लातूर जिल्ह्याचा दौरा केला. मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडला हजारो लीटर पाणी वापरल्याचा आरोप करण्यात आलाय.

औसा तालुक्यातल्या बेलकुंडमध्ये बनवण्यात आलेल्या हेलिपॅडसाठी टँकरच्या साहाय्यानं हजारो लीटर पाणी वापरल्याचा आरोप होतोय. लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. विशेष म्हणजे मिरजहून रेल्वेतून पाणी नेलं जातंय. 

अशी बिकट स्थिती असताना मंत्रीमहोदय अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय कसा करू शकतात असा सवाल उपस्थित झालाय. तर हजारो लीटर पाण्याचा वापर केला नसल्याचा दावा खडसेंनी केलाय. 

Tags: