फेसबूक, व्हाट्सअॅपला देणार मराठी मुलाचे इंटरनेट शिवाय एजे-बूक टक्कर

वडिलांचे चप्पलांचं दुकान, घरात कॉम्प्युटरचा फारसा संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य लोहकरेनं गगनभरारी घेतलीय. ब्रिलियंट एजेचा हा खास रिपोर्ट.

Updated: Nov 23, 2015, 11:18 AM IST
फेसबूक, व्हाट्सअॅपला देणार मराठी मुलाचे  इंटरनेट शिवाय एजे-बूक टक्कर title=

शिर्डी : वडिलांचे चप्पलांचं दुकान, घरात कॉम्प्युटरचा फारसा संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य लोहकरेनं गगनभरारी घेतलीय. ब्रिलियंट एजेचा हा खास रिपोर्ट.

अजिंक्य लोहकरे. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव इथं कॉम्प्युटर इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतोय. अजिंक्यने फिनिक्स भरारी घेत जगभरातल्या टॉप आयटी कंपन्यांना आपल्या दारात उभं केलंय. याला निमित्त ठरलंय ते अजिंक्यनं बनवलेलं एजे बूक हे अॅप आणि सॉफ्टवेअर. 

फेसबूक, अॅपलकडून कोटींची ऑफर

व्हॉट्सअॅप किंवा फेसबूकला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या या सॉफ्टवेअरची दखल जगानं घेतली. फेसबूकनं तर अजिंक्यला १ कोटी ६७ लाखांची ऑफर दिली. विप्रो, इन्फोसिससारख्या कंपन्यांचीही ऑफर त्याच्याकडे होती. त्यामुळं त्यानं वेट अॅन्ड वॉच धोरण अवलंबलं. त्याचं फळही त्याला मिळालं.

दोन कोटी रुपये वार्षिक पॅकेज आणि इतर सवलती देऊन अॅपलनं अजिंक्यला आपलंसं केलं. डिसेंबरमध्ये तो अॅपलच्या मुख्य कार्यालयात रुजू होणार आहे. व्हॉटसअॅपमध्ये फक्त १०० एमबीपर्यंत डाटा शेअरिंग करता येते. मात्र, एजेबूकमध्ये २ जीबीपर्यंत डाटा शेअरिंग होऊ शकतो. विशेष म्हणजे यात इंटरनेट कनेक्शन हवेच असे नाही. इंटरनेट नसताना साडेतीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरात दोन डिव्हाईस कनेक्ट होऊन डाटा शेअरिंग होऊ शकते. 

एखादा मॅसेज फॉरवर्ड करताना तो प्रत्येक वेळेस फॉरवर्ड करावा लागतो. तेच एजेबूकमध्ये सर्वांना एकादच फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. फेसबूक किंवा व्हॉट्सअॅप मॅसेजशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने यात फिचर उपलब्ध असून २०१६ मध्ये हे कार्यन्वित होऊ शकते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.