सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत

सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय.

Updated: Dec 12, 2014, 02:51 PM IST
सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत title=

नागपूर : सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या दोघांच्या चौकशीसाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. आज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात महाअधिवक्ता सुनील मनोहर यांनी मुख्यमंत्र्यांनी ही फाईल क्लिअर केल्याचं सांगितलं.

त्यामुळे आता सिंचन घोटाळा प्रकरणी या दोघांची चौकशी करण्याचा ACBचा मार्ग मोकळा झालाय. तर या एकदाच काय ती या प्रकरणाची चौकशी होऊन जाऊ द्या म्हणजे जनतेसमोर सत्य बाहेर येईल....

दरम्यान, कोणत्य़ाही चौकशीला राष्ट्रवादी काँग्रसचे नेते तयार असल्याचं पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. यामुळे सत्य लोकांसमोर येईल, असंही ते म्हणालेत.

तर अजित पवार आणि तटकरे यांनी स्वतःच चौकशीला सामोरं जाण्याची तयारी अनेकदा दर्शवल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.