पैठण : राज्यात तूर खरेदी केंद्र बंद झाल्याचा सगळ्यात मोठा फटका औरंगाबादमधल्या पैठणच्या रंगनाथ आल्हाट या 75 वर्षाच्या शेतक-याला बसलाय.....
केंद्र बंद झाल्यानंतरही सुरु होईल या प्रतीक्षेत रंगनाथ पैठणच्या तूर खरेदी केंद्राबाहेर गेले दोन दिवस बसून राहिले.....
त्यात काल या वृद्ध शेतक-याला दुपारी चक्कर आल्यानं ते पडले आणि त्यांच्या पायाला फ्रँक्चर झालं. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
आधीच तूर विकली गेली नसल्यानं त्यांच्या कडे पैसै नाहीत, त्यात आता उपचाराचा खर्चही त्यांना पेलावणारा नाही.