अमरावतीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण

शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं, आंदोलनात शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी आंदोलन केलं होतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 5, 2017, 10:43 PM IST
अमरावतीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण title=

अमरावती : शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं, आंदोलनात शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी आंदोलन केलं होतं. 

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.  यावेळी या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये दगडफेक झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याच्या फवारा मारला. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. या हिंसक आंदोलनात सुमारे 30 ते 40 आंदोलक जखमी झालेत. संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसही जखमी झालेत. 

गेल्या ४ महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळाली नाही, म्हणून एक वृद्ध महिला या मोर्च्यात सामील झाल्या होत्या त्यानाही पोलिसांनी मारहाण केली.