सुनेचा विजय साजरा करताना सासऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू

औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली आणि नांदेडमध्ये २० नगरपरिषदेसाठी आणि २ नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. गडचिरोलीमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं आहे. मात्र या आनंदाला गालबोट लागणारी घटना गडचिरोलीत घडली आहे. एका विजयी उमेदवाराच्या जल्लोषात एकाचा मृत्यू झाला आहे.

Updated: Dec 20, 2016, 12:12 AM IST
सुनेचा विजय साजरा करताना सासऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू title=

गडचिरोली : औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली आणि नांदेडमध्ये २० नगरपरिषदेसाठी आणि २ नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. गडचिरोलीमध्ये भाजपने मोठं यश मिळवलं आहे. मात्र या आनंदाला गालबोट लागणारी घटना गडचिरोलीत घडली आहे. एका विजयी उमेदवाराच्या जल्लोषात एकाचा मृत्यू झाला आहे.

सुनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना सासऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गडचिरोलीतील प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा आखाडे विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचा जल्लोष करताना त्यांचे सासरे सुरेश आखाडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गडचिरोलीमध्ये दुःखाचं वातावरण आहे.