उरण, रायगड: रायगड जिल्ह्यामधल्या उरण तालुक्यातल्या जंगलात सापडलेल्या मानवी अवयवांचं गूढ अखेर उकललं आहे. जन्मदात्यानंच मुलीची हत्या केल्याचं यात उघड झालंय.
८ फेब्रुवारीला उरण मधल्या चिरनेर नजिकच्या इंद्रायणी डोंगरातल्या जंगलात, मानवी देहाचे अवयव सापडले होते. पोलीस तपासात उरण नजिकच्या केळवणे गावातली सिद्धी नावाची मुलगी बेपत्ता झाल्याचं उघड झालं. १५ वर्षांची सिद्धी घरी काहीच न सांगता, ४-५ दिवस घराबाहेर राहायची. यामुळं संतापलेले तिचे वडील सुनील घरत यांनी २० जानेवारीला तिला इंद्रायणी डोंगरात नेऊन, ओढणीनं गळा आवळून तिची हत्या केली होती.
त्यानंतर २३ जानेवारीला पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन सुनील घरतनं तिच्या अवयवांचे तुकडे केले होते. त्यानं आपला गुन्हा कबूल केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.