पित्याचा मुलीवर ३ जणांसह सामूहिक बलात्कार

पित्याने मुलीवर एका शेत शिवारात बलात्कार केला, ही घटना चार जणांनी पाहिली, त्यातील तीन जणांनी या मुलीवर बलात्कार केला, तसेच चौथ्याने याचे व्हिडीओ चित्रिकरण केले असा आरोप आहे. निफाड न्यायालयाने या ३ आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

Updated: Jan 14, 2016, 06:45 PM IST
पित्याचा मुलीवर ३ जणांसह सामूहिक बलात्कार title=

नाशिक : पित्याने मुलीवर एका शेत शिवारात बलात्कार केला, ही घटना चार जणांनी पाहिली, त्यातील तीन जणांनी या मुलीवर बलात्कार केला, तसेच चौथ्याने याचे व्हिडीओ चित्रिकरण केले असा आरोप आहे. निफाड न्यायालयाने या ३ आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

बलात्कारी पिता अद्यापही फरार आहे. पाचव्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. ती आपल्या गावाहून २२ डिसेंबरला कावीळ उतरविण्यासाठी पित्यासोबत गेली होती. तेथून परतताना करंजी शिवारातील एका नाल्यात सकाळी साडेआठच्या दरम्यान पित्याने तिच्यावर बलात्कार केला. 

ही घटना चौघा तरुणांनी पाहिल्यानंतर त्यांनी दमदाटी केली, त्यातील तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर मुलीने कुणालाही काही सांगू नये म्हणून आरोपींनी दमदाटी केली.