मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ गोळीबार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर गोळीबार झाला आहे. नागपुरातील मुख्यमंत्र्याच्या घराजवळ हा गोळीबार झाला.

Updated: Dec 2, 2014, 09:19 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ गोळीबार title=

नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर गोळीबार झाला आहे. नागपुरातील मुख्यमंत्र्याच्या घराजवळ हा गोळीबार झाला.
 
शहरातील धरमपेठ भागात आज दुपारी गोळीबाराच्या एका घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी २ च्या सुमारास सुदामा थिएटरच्या मागे अचानक एक कार साहिल भांगळे यांच्या घरात घुसली. 

या घटनेचा तपास करताना  कारच्या आत गोळी चालल्याचं आणि चालक साबीर सिद्दकी जखमी झाल्याचं स्पष्ट झालं. घटनेनंतर कारमध्ये बसलेल्या तिघांनी जखमी साबीर सिद्दकीला रुग्णालयात दाखल केलं.
 
घटनेत कार चालक जखमी झाल्यामुळेच कार अनियंत्रित होऊन समोरच्या घरात आदळली.  कारमध्ये मोठी रक्कम असल्याने लुटीच्या उद्दिष्टाने हल्ला करण्यात आला होता का याचा तपास सुरू आहे. शिवाय यामागे टोळीयुद्धाची बाजूही पोलिस तपासून बघत आहेत. 

दरम्यान, जखमी झालेला साबीर आणि कारमध्ये बसलेले इतर तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.