गडचिरोली : मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आजही कायम आहे. यामुळे अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील जवळजवळ २५० गावांचा संपर्क तुटला आहे. जवळपास १० ते १५ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सिरोंचा तालुक्यात अनेक घरांची पडझड झालीये.. भामरागडमध्येही १० मार्ग बंद आहे. अतिवृष्टीमुळे भामरागडचा विद्युत पुरवठा आणि मोबाईलसेवा खंडीत झाली आहे. विश्वेश्वरराव चौकात पाणी शिरल्याने या भागातील 500 कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. गोसेखुर्द धरणाचे ३३ गेट दीड मीटरने उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कामगिरीने २ ग्रामस्थांना पूरातून वाचवण्यात यश मिळाले आहे. वेधशाळेकडून प्राप्त इशा-याच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्वीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे मागील ७२ तासात एकही मनुष्यहानी झालेली नाही.