नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या परदेशी फळांची आवक चांगली होत आहे. यात सफरचंद, किवी, ड्रॅगन फ्रुट, संत्र, द्राक्ष यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतीय फळांच्या तुलनेत ही परदेशी फळं 32 टक्के स्टॅम्प ड्युटी भरून देखील स्वस्त मिळत असल्याने या परदेशी फळांची विक्री चांगली होत आहे.
सध्या भारतात सफरचंदाचा सीझन नसल्याने तुर्की, इराण, वॉशिंग्टन, बेल्जियम येथून भारतात सफरचंद येत आहेत. भारतीय सफरचंदाच्या तुलनेत ही सफरचंद स्वस्त विकली जात आहेत. भारतीय सफरचंद 60 ते 150 रुपये किलोने विकली जाताहेत. तर तुर्की सफरचंद 100 ते 120 रूपये किलोने विकली जाताहेत. बेल्जियम 70 ते 80 रुपये किलो तर इराणी सफरचंद 80 ते 100 रुपये किलोने विकली जात आहेत.