माजी खासदार सदाशिवराव मंडलिक कालवश

काँग्रेस नेते आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 

Updated: Mar 10, 2015, 08:42 AM IST
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक कालवश title=

कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 

सदाशिवराव मंडलिक यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, तेव्हा त्यांना हृदय विकाराचा झटका आला. ते ८० वर्षांचे होते.

सदाशिवराव मंडलिक यांच्यावर कागल तालुक्यातील त्यांच्या मूळ मुरगुड गावी आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सदाशिवराव मंडलिक पहिल्यांदा १९७२ साली विधानसभेवर निवडून गेले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.