शिवस्मारकाचे 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Dec 17, 2016, 07:09 PM IST
शिवस्मारकाचे 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन title=

नागपूर : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेचं पंतप्रधान भूमिपूजन करतील.

एकंदर दोन टप्प्यात होणार असलेल्या या कामापैकी पहिल्या टप्प्यात 2 हजार 300 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये तुळजाभवानी मंदिर, हेलिपॅड, ऍम्फीथिएटर यांचा समावेश असणार आहे. या भूमिपूजनच्या वेळी 70 हून अधिक नद्यांचं पाणी आणि किल्ल्यावरुन माती आणली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेमध्ये निवेदनाद्वारे ही माहिती दिली. 

शिवस्मारकाच्या भूमिपूजनानंतर मोदी बीकेसीमध्ये जाऊन मेट्रो प्रकल्पाचंही भूमीपूजन करणार आहेत. ही दोन्ही भूमिपूजन झाल्यानंतर मोदींची वांद्र्यामध्ये जाहीर सभादेखील होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी पंतप्रधानांचं हा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.