सुनेनं घातला सासुलाच गंडा!

ठाण्यातल्या कोपरी भागात एका सुनेनं सासुलाच गंडा घातलाय. थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 75 हजारांनी तिनं सासुला गंडा घातलाय. 

Updated: Dec 22, 2016, 05:12 PM IST
सुनेनं घातला सासुलाच गंडा! title=

ठाणे : ठाण्यातल्या कोपरी भागात एका सुनेनं सासुलाच गंडा घातलाय. थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 75 हजारांनी तिनं सासुला गंडा घातलाय. 

मंजुषा महेशगिरी गोसावी असं या सुनेचं नावं... सासुला गावाला पाठवण्यासाठी तिनं नवऱ्याकडे हट्ट् धरला... एव्हढ्यावर ती थांबली नाही तर तिनं त्यासाठी नवऱ्याला मारहाणही केली.

त्यानंतर सासुच्या निवृत्ती वेतनाच्या बँक खात्यातून 75 हजार रुपये परस्पर हडप केल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. मंजुषाचा नवरा महेशगिरीनं ही तक्रार केलीय. सर्व आईच्या आणि आपल्या नावे असलेली मालमत्ता स्व:तच्या नावे करण्याचा हट्ट्ही तिने केला. तो पूर्ण न केल्यास आत्महत्येची धमकी मंजुषानं महेशगिरीला दिली होती. शिवाय परिसरात बदनामीची धमकीही दिली होती.

त्याआधी तिने 8 जूनला सासूच्या खात्यातून 75 हजार रुपये चेकद्वारे मिळवले. त्यासाठी तिनं चेकवर बनावट सहीदेखील केली होती. एव्हढं करून पुन्हा तिने सासू आणि नवऱ्याला धमकी दिली. या साऱ्याला कंटाळून अखेर नवऱ्यानं कोपरी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार नोंदवलीय.