कोल्हापूर : चंदगडच्या एव्हीएच कंपनीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार, कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल केला. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीत तोडफोड करत गाड्याही जाळल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली आहे.
जिल्ह्यातील चंदगड इथल्या हलकर्णी एमआयडीसीतील एव्हीएच केमिकल कंपनीला आज लोकक्षोभोला सामोरं जावं लागलं. कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या क्वाटर्सवर आंदोलकांनी आज जोरदार हल्ला केला. आंदोलकांनी अनेक गाड्याही पेटवून दिल्यात. यात पोलिसांच्या गाड्यांनाही लक्ष्य करण्यात आलं.
एव्हीएच केमिकल कंपनीच्या कोलटार डिस्टीलेशन प्लॅन्टविरोधात गेल्या तीन वर्षांपासुन आंदोलन सुरू आहे. मात्र लोकांच्या प्रक्षोभाला मोकळी वाट मिळत नसल्यामुळेच त्यांना कायदा हाती घेण्याची वेळ आली. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे आधिकारी आणि स्टेट एक्सपर्ट कमिटीचे आधिकारी टी. सी. बेंजोमन हे एव्हीएच कंपनीला गुपचूप भेट देण्यास येणार असल्याचं आंदोलकांना समजलं. यामुळे आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी तोडफोड केली.
सकाळी १० वाजता सुरू झालेला हा गोंधळ संध्याकाळी ६ पर्यंत सुरू होता. दरम्यान, कंपनीच्या उत्पादनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आंदोलक काही प्रमाणात शांत झाले. लोकांना पूर्ण स्वराज्य नसल्याचुळेच अशी आंदोलनं होत असल्याचं वास्तव आहे. झी मीडियानं कंपनीविरोधात FIR दाखल झाल्याची बातमी दाखवली आणि कोणत्याही राजकीय पाठिंब्याविना हे आंदोलन उभं राहिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.