रत्नागिरी : जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून १७ तारखेला रत्नागिरीत मोर्चा काढणार आहे. प्रकल्पाचं रत्नागिरीतील कार्यालय बंद पाडणार, असा इशारा आमदार उदय सामंता यांनी दिला आहे.
जैतापूर प्रकल्पावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रकल्पाविरोधात शिवसेना १७ तारखेला मोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली. तर रत्नागिरीतलं जैतापूर प्रकल्पाचं कार्यालय बंद करण्यात येईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे पुन्हा जैतापूर प्रकल्पावरुन घमासान होण्याची चिन्हे आहेत.
रत्नागिरीतल्या जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पा विरोधाचा एकभाग म्हणून जन-आंदोलनाच्या माध्यमातून रत्नागिरीतलं प्रकल्पाचं मुख्य कार्यालय बंद पाडण्याची हाक शिवसेनेनी दिलीय. तर जन-आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रकल्प इथल्या जनतेला नको आहे याची जाणीव, शिवसेना मोदी सरकारला करुन देणार आहे, असे सेनेतर्फे सांगण्यात येत आहे.
या धडक मोर्चा आंदोलनात रत्नागिरीतील शिवसेनेचे सर्वच आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यालय बंद पाडण्यासाठी शिवसेनेला गरज पडल्यास कार्यालयाची तोड़फोड सुद्धा करण्याची तयारी असल्याचं शिवसेनेकडून सष्ट करण्यात आली आहे. हाजारोंच्या संख्येनी शिवसैनिक आणि प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी होणार आहेत, असे राजन साळवी यांनी सांगितले.
सेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून खडके उडाल्याचं पाहायला मिळतायेत. त्यात जैतापूर प्रकल्पाबाबत सेना मोर्चाच्या माध्यमातून भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने प्रकल्पाच्या कार्यालयाबर जी धडक मोर्चाची हाक दिली आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, राजापूरचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.