आता, 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांना निलंबनाची धमकी

'एफटीआयआय'मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी थांबवावं, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात येईल, अशा इशारा संस्थेच्या संचालकांनी दिलाय. तशा आशयाच्या कारवाईच्या नोटिसा विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्यात.

Updated: Jul 16, 2015, 01:33 PM IST
आता, 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांना निलंबनाची धमकी title=
सौ. डीएनए

पुणे : 'एफटीआयआय'मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी थांबवावं, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात येईल, अशा इशारा संस्थेच्या संचालकांनी दिलाय. तशा आशयाच्या कारवाईच्या नोटिसा विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्यात.

एफटीआयआयच्या प्रमुखपदी केंद्र सरकारनं महाभारत मालिकेत युधिष्ठिराची भूमिका करणा-या गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केलीय. मात्र त्यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. चौहान यांची नियुक्ती रद्द व्हावी, या मागणीसाठी FTII मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.