औरंगाबादमध्ये २ ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात, ४ ठार

शहरातील अंजिठा पोलीस स्टेशनसमोर दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाल्यानंतर ट्रकनं पेट घेतल्यामुळं ४ जण ठार झाले आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील ही घटना आहे.

Updated: Jul 16, 2015, 01:04 PM IST
औरंगाबादमध्ये २ ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात, ४ ठार title=

औरंगाबाद: शहरातील अंजिठा पोलीस स्टेशनसमोर दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाल्यानंतर ट्रकनं पेट घेतल्यामुळं ४ जण ठार झाले आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील ही घटना आहे.

अजिंठा गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळं बांबूची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं पेट घेतला आणि चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तसंच तीन जण जखमीही झालेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सिमेंट आणि लाकडांनी भरलेले हे ट्रक होते.

घटनेचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या अपघातामुळं महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.