परेश रावलने राहुल गांधींना 'अॅक्टर' म्हणून मारला टॉन्ट

गजेंद्र चव्हाण यांच्यामध्ये एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना एक राजकीय नेता दिसतो, तर काय राहुल गांधी यांच्यामध्ये विद्याथ्यांना एक अभिनेता दिसतो का असा टॉन्ट भारतीय जनता पक्षाचे खासदास आणि अभिनेता परेश रावल यांनी राहुल गांधी यांना मारला आहे. 

Updated: Jul 31, 2015, 06:16 PM IST
परेश रावलने राहुल गांधींना 'अॅक्टर' म्हणून मारला टॉन्ट title=

पुणे : गजेंद्र चव्हाण यांच्यामध्ये एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना एक राजकीय नेता दिसतो, तर काय राहुल गांधी यांच्यामध्ये विद्याथ्यांना एक अभिनेता दिसतो का असा टॉन्ट भारतीय जनता पक्षाचे खासदास आणि अभिनेता परेश रावल यांनी राहुल गांधी यांना मारला आहे. 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील एफटीआयआयमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोधात हे आंदोलन होत आहे. 

राहुल गांधी यांना बोलण्यासाठी एक मुद्दा मिळाला आहे. त्यांना खूश राहू द्या. विद्यार्थ्यांना गजेंद्र चौहान यांच्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता दिसत असेल तर राहुल गांधी यांच्यात त्यांना सत्यजीत रे दिसतात का, असा प्रश्न परेश रावल यांनी केला आहे. 

दरम्यान, पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला. राहुल वापस जाओ अशा घोषणा ही केल्यात. यावेळी एनएसयूआय कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एफटीआयआयमध्ये टीव्ही कलाकार गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवर वाद निर्माण झाला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.