पुणे : पुण्याजवळ डोणजे गावात शेतात चक्क गणपती बाप्पा अवतरले आहेत. डोणजे गावात श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांची शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात पॅडी आर्ट या तंत्राद्वारे चक्क गणपतीबाप्पा साकारले.
शेतीची विशिष्ट पद्धतीने लागवड आणि मशागत करून ही कलाकृती साधली आहे. भात शेतीचे दोन प्रकार वापरून त्यांनी ही कलाकृती साधली आहे. विशेष म्हणजे पुढच्या चार महिन्यात जसा भात पिकेल तसे या कलाकृतीचे रंगही बदलणार आहेत.
पाहा व्हिडिओ